Ajit Pawar (@AjitPawarSpeaks )

Ajit Pawar

Bio Deputy Chief Minister, Maharashtra | Member of Legislative Assembly, Baramati | Nationalist Congress Party Leader.
Location Maharashtra, India
Tweets 4,7K
Followers 934,7K
Following 33
Account created 07-03-2014 07:49:55
ID 2376754662

iPhone : Saddened to hear about the demise of Former Chief Minister of Assam & Senior Congress Leader, Tarun Gogoi ji. My condolences to the Gogoi family 🙏🏼

iPhone : उद्याच्या ५० वर्षांचा विचार करुन पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या परिसरात २ रिंग रोडची कामं प्रस्तावित आहेत. त्यात ज्यांच्या जमिनी जातील त्या सर्वांना योग्य आर्थिक मोबदला दिला जाईल.

iPhone : गरजेपुरतं पाणी मिळणं हा पुणेकरांचा हक्क आहे. त्यामुळे,भामा आसखेडच्या बाबतीत आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागला.त्यामागे कोणाला काही त्रास व्हावा ही भावना नाही.उर्वरीत पाणी खालच्या शेतकऱ्यांनाही मिळणं महत्त्वाचं आहे. अशा प्रश्नांतून मार्ग काढण्याचं काम NCP अनेक वर्ष करत आहे.

iPhone : पुणेकरांना लवकरात लवकर मेट्रोची सुविधा देऊन वाहतुकीवरचा ताण कसा कमी करता येईल याकडे आमचं लक्ष आहे. कुठेही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. कचरा प्रश्न, सोलापूर रोडची वाहतूककोंडी यांसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मी, Dilip Walse Patil आणि इतर सहकारी प्रयत्नशील आहोत.

Twitter Web App : काही लोकं काहीही बरायळा लागली आहेत. विशेष करून विरोधी पक्षनेते खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत, हे कितीपत योग्य आहे. पवार साहेबांनी एखाद्या व्यक्तीला केंद्रित करून राजकारण केलं नाही. समाजासाठी त्यांनी काम केलं. ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही त्यांनी टीका करू नये.

Twitter Web App : पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं काम करीत असताना आपल्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन पुढे चला. काही उमेदवार शरद पवार साहेबांचा, उद्धव ठाकरेंचा आणि माझा फोटो सोबत घेऊन प्रचार करतायेत. पण ते उमेदवार आपले नाहीत, ही गोष्ट लक्षात असू द्या.

Twitter Web App : एकदा कोरोना झाला म्हणून काळजी घ्यायची नाही, असा गैरसमज करून घेऊ नका. गाफील राहू नका. काळजी घेतली नाही तर, पुन्हा कोरोना होऊ शकतो. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक सर्व नियम काटेकोरपणे पाळा.

Twitter Web App : प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून आपण मतदारांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सामंजस्य भूमिकेतून आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. कामं करीत असताना उद्भवणाऱ्या अडचणी पक्ष नेतृत्व नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करील.

Twitter Web App : कोरोना काळात जिल्हा परिषद व पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात आणखी २७ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आम्ही करतोय. आरोग्याशी संबंधित जे अधिकारी आहेत, त्यांच्या सहकार्यानं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Twitter Web App : युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. इंग्लंडमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून, शक्य तेवढी खबरदारी घेऊनच येणाऱ्या काळात संकटाचा मुकाबला करायचा आहे. त्यामुळे गाफील राहू नका, काळजी घ्या, अशी विनंती नागरिकांना केली.

Twitter Web App : कोरोना काळात सेवा देणारे स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर्स-नर्सेस, इतर सर्व फोर्सेस यांचं यावेळी, कौतुक आणि अभिनंदन केलं. कोरोनामुळे व्यवसाय-उद्योगांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. एखादा आजार जगाचं चक्र कसं थांबवू शकतो, हे कोरोनाच्या निमित्तानं आपल्याला कळलं.

Twitter Web App : पिंपरी-चिंचवड शहरात वारंवार कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न डोकं वर काढत असतो. त्यामुळे, पोलिस दलाचा आदरयुक्त दबदबा रहावा यासाठी, कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मुभा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे.

Twitter Web App : २५ वर्ष सर्वांच्या सहकार्यानं विकासाची कामं करत, कष्टकऱ्यांची नगरी असा लौकीक असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचं काम आपण सर्वांनी केलं.मागील चुकांची पुनरावृत्ती होऊ न देता आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे,असं आजी-माजी नगरसेवकांना,कार्यकर्त्यांना यावेळी सूचित केलं.

Twitter Web App : युवक, युवती, शिक्षण संस्था चालवणारे सहकारी यांनी आॕडिओ- व्हिडीओ, समाजमाध्यमांच्या आधारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम जोराने करावं, अशा सूचना केल्या. या सर्व मतदारांचे प्रश्न 'महाविकास आघाडी'च्या माध्यमातून सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न होईल, अशी खात्री दिली!

Twitter Web App : आज, पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित प्रचार मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी, महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करण्याचं आवाहन मतदारांना केलं.

iPhone : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा महाराष्ट्र वीरांना आजच्या ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिना’निमित्त भावपूर्ण वंदन! हा लढा म्हणजे महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास आहे. या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

Twitter Web App : आज, मंत्रालयात देशाच्या माजी पंतप्रधान, स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचं स्वातंत्र्य व राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवणं,ती अधिक दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक कार्य करण्याची शपथ घेतली.

iPhone : Tribute to the First Woman Prime Minister of our Country, Smt. Indira Gandhi ji on her birth anniversary today. One of the most formidable PM, she earned the title of ‘The Iron Lady of India’!

iPhone : अनेक जाती,धर्म,पंथांना,स्त्रीशक्तीला सोबत घेऊन राज्यकारभार करणाऱ्या महापराक्रमी योद्ध्या,आदर्श राज्यकर्त्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! १८५७ च्या इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘मेरी झांशी नही दूंगी’ म्हणत अतुलनीय शौर्याचं दर्शन त्यांनी घडवलं.

iPhone : नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य करणारे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!