Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT )

Office of Uddhav Thackeray

Bio Official account of the Office of @ShivSena Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Chief Minister of Maharashtra
Location Mumbai, India
Tweets 1,2K
Followers 895,8K
Following 15
Account created 27-06-2019 09:05:02
ID 1144169755672113155

iPhone : Progress report of the My Family My Responsibility Campaign.

The campaign entails door-to-door survey for tracing & treating COVID 19 patients, identifying people with co-morbidities, raising awareness & educating citizens on safety measures to break the chain of transmission.

iPhone : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेची पहिल्या आठवड्यातील अंमलबजावणी!

या मोहिमेमध्ये गृहभेटींद्वारे संशयित कोरोना रुग्ण शोधणे, कोमॉर्बीड रुग्णांची नोंद करणे,उपचार करणे,आरोग्य शिक्षण व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेला महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे यासाठी सर्वेक्षण केले जाते.

iPhone : कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर जी यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे एक धडाडीचे शिवसैनिक, मनमिळावू लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏼

iPhone : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेण्यात आले.

#मंत्रिमंडळनिर्णय

iPhone : महाराष्ट्र माझे कुटुंब आहे आणि महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणे ही माझी व प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीची जबाबदारी आहे.शासनाने कोरोनावर मात करण्यासाठी सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमध्ये आपण सहभाग घेऊन मोहिमेला लोकचळवळ बनवूया आणि महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढूया.

iPhone : Maharashtra attracts highest FDI in India & should continue as an attractive option for investors, for its growth in the Industrial sector. Hence an action plan for effective implementation of Ease of Doing Business should be drawn up, directed CM Uddhav Balasaheb Thackeray.

iPhone : देशात महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य असून उद्योग क्षेत्रात एक पाऊल पुढे राहण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिजनेस प्रभावीपणे राबवायला हवे.यासाठी उद्योग विभागाने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ईज ऑफ डुईंग बिजनेस आढावा बैठकीत दिले

iPhone : आदरणीय प्रधानमंत्री श्री. Narendra Modi जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आपके अच्छे स्वास्थ्य और सुखमय जीवन की कामना करता हूं।

iPhone : पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीतील आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यासाठी प्रबोधनकारांच्या कार्याला मानाचा मुजरा आणि जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन🙏🏼

iPhone : सामाजिक सुधारणा हेच ध्येय मानणारे, परखड पत्रकार, इतिहास संशोधक, अमोघ वक्ते केशव ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती!

अनिष्ट रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता यावर प्रबोधनकारांनी आपल्या वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृतीने घणाघात केला.

iPhone : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पोलिस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

#मंत्रिमंडळनिर्णय

iPhone : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात डोर-टू-डोर सर्वेक्षण.

Door-to-door survey as part of the Majhe Kutumb, Majhi Jababdari campaign, Solapur district.

iPhone : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेद्वारे आपण कोरोनावर आक्रमण करून त्याला रोखणार आहोत,त्यामुळे प्रत्येक सरपंचाने कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून आपल्या गावांमध्ये मोहीम राबवून परिवारांना आरोग्यसंपन्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मोहिमेचे उद्घाटन करताना केले.

iPhone : मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत.

iPhone : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते कृषी विभागाच्या "विकेल ते पिकेल" या अभियानाचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात येत आहे.

लाइव्ह बघा: youtu.be/7MKl9zUCdTY

iPhone : माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम काय आहे?

  • Start Video

iPhone : माझे कुटुंब, माझी जबाबदारी कार्यक्रमात सर्वांनी एकत्रितपणे काम केले तर आपण संकटापासून सुरक्षित राहू व जनतेला सुरक्षित ठेऊ.मी सर्व सदस्यांना धन्यवाद देतो,असेच सहकार्य प्रत्येक वेळी, पुढचे अनेक वर्षे आम्हाला सभागृहात आपल्याकडून मिळत राहील अशी अपेक्षा करतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!

iPhone : ही जनजागृतीची मोहीम महाराष्ट्रामध्ये पहिल्या फेरीत २२ दिवस व दुसऱ्या फेरीत १२ दिवस करायची आहे. यामध्ये कुटुंबाच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाईल, ते High Risk गटातील आहेत का, ज्येष्ठ नागरिक, इतर आजार असणाऱ्या व्यक्ती शोधण्यात येतील व आवश्यकतेनुसार आपण त्यांच्यावर इलाज करणार आहोत.